सततच चालत आलंय...लिंग आणि योनीचं धर्मयुद्ध...
सुटली नाही आठ वर्षांची योनी तीही बलात्काराने क्षुब्ध...
सततच खुडल्या आहेत धर्माने उमलत्या कळ्या...
उमलत्या वयातही इथे उध्वस्त योनीच्या पाकळ्या..
मंदिरातील पुजारीच बनतात जेंव्हा भक्षक...
गळलेल्या वीर्याक्षणी बनतो देवाधर्माचा तो रक्षक...
नागवल्या जातात बाया म्हणत अल्लाहू अकबर...
चिरून टाकली जातात स्तनांची लक्तरे वेशीवर...
खुपसुनी तलवार घेतात ते गर्भातील अर्भकाचा ठाव...
जय श्रीराम म्हणत नेहमीप्रमाणे गोळा सारा गाव...
सततच ताठून उभं राहिलय लिंग माणुसकीच्या छाताडावर...
पेटून उठायचं की नाही हेही ठरतं योनीच्या जातकुळावर...
कसा सोडवावा योनीत गोळा झालेला धर्म...
कसे पटवून द्यावे माणसाला माणुसकीचे मर्म...
- विनायक होगाडे

Man I appreciate your Hard to hear but bitter truth.... मित्रा थांबू नको.. शब्दांची धार अशीच राहू दे...
ReplyDelete