Tuesday 1 August 2017

'पिंक' लिपस्टिक अंडर हर 'पार्च्ड' बुरखा...!


3 सिनेमे...मांडणी वेगवेगळी...विषय मात्र तो...ज्यावर समाजात बोलणंही पाप...! तीन्ही सिनेमांच्या केंद्रस्थानी आहेत 'नायिका'...! तीन्ही चित्रपटांची कथा या नायिकांभोवताली फिरते...! अर्थातच... ते तीन चित्रपट म्हणजे 'पिंक' 'पार्च्ड' आणि 'लिपस्टिक अंडर माय बुरखा'...!

सेन्सॉरने नाय-व्हय म्हणत परवानगी दिलेला 'लिपस्टिक अंडर...'हा चित्रपट...!
'पिंक' हा दिल्लीत एकत्र राहणाऱ्या आणि स्वतःच्या पायावर उभ्या असणाऱ्या तीन तरुण मुलींची कथा...!
'पार्च्ड' हा गुजरातमधल्या एका छोट्या गावातील 3 महिलांची कथा...ज्या गावात सगळे निर्णय जातपंचायतच घेते...  'लिपस्टिक...' हा भोपाळमधल्या एकाच मोहल्ल्यात अथवा वस्तीत राहणार्या 4 महिलांची कथा असलेला चित्रपट...! भारतीय चित्रपट इतिहासात 'बाई' केंद्रस्थानी ठेवून तिच्या लैंगिक आणि एकूणच स्वातंत्र्याविषयी भाष्य करणारे चित्रपट येताहेत... ही खरं तर आनंदाची बाब आहे...!

'पिंक' मध्ये आहेत मीनल,फलक आणि ऍंड्रीया...! एका पार्टीत मीनलवर घडलेल्या जबरदस्तीच्या बलात्काराच्या प्रयत्नापासून बचाव करण्यासाठी ती 'त्याला' डोक्यावर बॉटल मारून जखमी करते आणि सुटका करून घेते... आणि इथूनच कथेची सुरुवात होते...! त्या तिघीनी वेश्या आहोत असं सांगून आम्हाला उद्युक्त केलं आणि नंतर जीवे मारण्याचा प्रयत्न केला...अशी केस तिच्यावर दाखल होते... आणि मग सुरू होतो खटला आणि खटल्यामागेही चालणाऱ्या दबवाची कथा...! दीपक सेहगल नावाचा रिटायर्ड वकील तिघींना मदत करतो...चित्रपटात चालणारा खटला इतका रंजक वाटतो की बस्स...!
"किसी भी लडकी को किसीभी लडके के साथ बेटी कर शराब नहीं पिनी चाहीय... अगर वो ऐसा करती है तो लडके को वो इंडिकेट होता है की अगर लडकी मेरे साथ शराब पी सकती है तो उसके साथ सोने के लिये भी कतरायेगी नही..!"
अमिताभ अर्थात सेहगल वकिलाच्या तोंडातील ही आणि अशी अनेक वाक्य बाईला नेहमीच गृहीत धरणाऱ्या सडक्या पुरुषी मेंदूच्या चिंद्या करतात...!

पार्च्ड मध्ये एक आहे ती 'लाजो'...जीला मुल होत नसल्याने दारुडा नवरा बेदम मारहाण करणारा आहे...तीला मूल होत नसत म्हणून ती परपुरुषाशी संबंध ठेवते पण तिचा नवरा मात्र 'ये मेरा नही हो सकता...तू साली रांड है...!' असं म्हणत मारहाण करतो...!
"मै रांड हूं पर तेरे जैसी बांझ नहीं...!"
हे वाक्य बाईला आजवर न आलेल्या मातृत्वामुळे तिच्या बाई म्हणून परिपूर्ण असण्यावर वेळोवेळी उठवल्या गेल्या प्रश्नांविषयी भंयकर चीड व्यक्त करत...!
दुसरी आहे 'बिजली'...जी वेश्या आहे आणि तिसरी आहे ती 'राणी'...जी विधवा असून 17 वर्षांच्या सडक्या पुरूषी वृत्तीच्या मुलाची आई आहे...त्याचं लग्न ज्या जानकीशी होत त्या तिच्या लहान सुनेचीही ही कहाणी आहे...!

'लिपस्टिक' मधल्या चौघीही वेगवेगळ्या वयाच्या आणि सांसारिक स्थितीमधल्या आहे...एक आहे 'लीला' जिचं लग्न ठरलंय पण बाहेर प्रेमप्रकरण सुरुय...अगदी साखरपुड्यालादेखील रात्री मित्रांसोबत सेक्स करणारी...सेक्स करताना बिनधास्त सेल्फी व्हिडीओ करणारी किंवा रात्री त्याच्या घरी जाऊन "बाथरूम खाली है क्या..? चल सेक्स करते है...!" असं विचारणारी...तिचं त्याच्यावर जीवापाड प्रेम आहे पण तिचा 'तो' मात्र तिला संभोगवस्तूप्रमाणे वापरून सोडून देतो...!
दुसरी आहे 'शिरीन अस्लम'   जीचा नवरा सौदीला कामाला आहे असं सांगतो पण घरचं भागत नाही म्हणून नवर्याला न सांगता सेल्स गर्ल म्हणून ती काम करते...तीन मुलं झाली पण कंडोम वापरल्यावर सेक्सची मजा नाही येत म्हणून तिची परवा न करता स्वतःची लैंगिक भूक भागवणारा आणि बाहेरही प्रेमप्रकरण करणारा नवरा...! तिला कामात बढती मिळते खरी...पण नवऱ्याला समजल्यावर नवरा मात्र 'बीवी हो... ज्यादा शौहर बनने की कोशीश मत कर.. !' असं म्हणून तिची लैंगिक भूक शमवण्याची कधीही परवा न करता तोच रटाळ सेक्स करणारा पण बाहेरही संबंध असणारा नवरा...! "कभी प्यार से चोदा नही ना नीचे...?" असं  लीला तिला विचारते तेंव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव एकंदर 'बाई'च्या कामतृप्तीबद्दलचे प्रश्न उपस्थित करतात...! कारण पुरुष स्वतःची लैंगिक भूक भागली की बाईला बाजूला सारतो...पण तिच्या कामतृप्तीच काय...याचा विचार होत नाही...!
 तिसरी आहे 'रेहाना अबीदी'...एक कॉलेजमध्ये शिकणारी तरुणी...जिला इतरांसारख आयुष्य एन्जॉय करण्याचं आकर्षण आहे... ज्या बूरख्यात ती जखडली गेलीय त्याचाच वापर करून ती मॉलमध्ये फॅन्सी कपड्यांच्या चोऱ्या...पबमध्ये पार्टी या सगळ्या गोष्टी करते...जीन्सबंदीविरोधातील आंदोलनात "जीन्स की आझादी...जिने की आझादी...!" हे स्वातंत्र्य मांडते... तिचा वापर करून एकटा तिलाही सोडून देतो...चौथी आहे बुवाजी...एक साधारण पन्नाशीच्या पुढची बाई...जी चोरून 'तसली' पुस्तके वाचते...! विशेष म्हणजे या चित्रपटाची कथाही अशाच एका सेक्सस्टोरीतून पुढे पुढे जात राहणारी दाखवली आहे...स्विमिंग शिकवणाऱ्या पिळदार शरीरयष्टी असणाऱ्या तरुण मुलाच्या सहवासासाठी बुवाजी स्विमिंग शिकायला सुरुवात करते...! त्याच्याशी 'रोझी' नावाने फोन करून सेक्स चॅटही करते...बुवाजीचे हे कारनामे समजल्यावर तिला बाजारू ओरत ठरवून घरातून बाहेर काढल जातं...!
या चौघीचीही व्यथा तीच होते...समाजाची मर्द मानसिकता त्यांना कुचकामी ठरवते...त्या चौघीचेही 'तो' त्यांना सोडून जातो...आणि मग समाजाची चौकट मोडलेल्या चौघीही एकत्र येऊन सेक्स स्टोरीतल्या रोझीची कथा पूर्ण करत सिगारेट ओढत या व्यथेचा सोहळा मांडत व्यवस्थेवर हसत राहतात...असा शेवट...!
पार्च्ड मात्र वेगळ्या पद्धतीने भाष्य करतो...
बाईची घुसमट आणि दडपलेल्या भावना तो शारीरिकतेतून सुचकतेने मांडतो...! राधिका आपटे अर्थात लाजो आणि राणी यांचं अर्धनग्न होऊन स्पर्शाच्या भाषेत एकमेकांची दुःख व्यक्त करणारा सीन अक्षरशः डोळे पानावतो...!


सुरवातीला त्याच चौकटीतून वागणारी राणी नंतर आपला मुलगा जेंव्हा आपल्या सुनेशी तशाच पुरूषी ठेक्याने वागतो हे समजल्यावर मात्र त्याला "मर्द बनना छोड...पहले इंसान बनना सीख..." असं दटावून सांगते...इतकंच नव्हे तर नंतर तिला तिच्या प्रियकरासोबत पळून जायला मदतही करते...!
बिजली जेंव्हा म्हणते की...'साला,ये गालिया भी मर्दोनेही बनाई होगी ना...?
मादरचोद, भेंचोद...! साला सब औरतकोही चोदते है...  मर्दो को कोई चोदताही नहीं...!" त्यावेळी तिघीही मुक्तपणे जोरजोरात 'बापचोद,बेटाचोद चाचाचोद' आशा शिव्या घालतात तेंव्हा अक्षरशः या व्यवस्थेच्या कानाखाली बसते...!
चित्रपटाचा शेवट अंगावर येतो...'आज का दिन नारी का देवत्व मनाने का दिन है...इसी दिन माँ दुर्गा ने महिषासुर का वध किया..." असं म्हणत दुर्गेची स्तुती गाण्यात गाव एकीकडे दंग आहे तर दुसरीकडे या तिघीही या व्यवस्थेला नागड करून फाट्यावर मारतात...

तीन्ही चित्रपट समाजव्यवस्थेवर थेट भाष्य करतात...!
'पिंक' अर्थात गुलाबी रंग हा बाईपणाचेच जणू प्रतीक...!
'लिपस्टिक' हे बाईच्या आकांक्षेच तर बुरखा हे या धर्माचं कोंदण लाभलेल्या व्यवस्थेचं प्रतीक...!
'Parched' म्हणजे ज्याला 'झुलसा हुवा' किंवा पोळलेल्या' असं म्हणता येईल...!

बाईच्या योनीशुचितेत अडकवलेली आणि वरुन धर्म नावान सजवलेली व्यवस्था मुळात जाऊन बाईच्या या घुसमटीबद्दल भाष्य करत नाही...! 'बलात्कार बाईच्या तंग कपड्यामुळे होतो,ही आणि अशी मांडणी बाईला संभोगवस्तू समजणाऱ्या मानसिकतेच्या मूळ  विषयाला बगल देणारी ठरते...पुरुषाच्या पुरुषी मानसिकतेवर किंवा मर्दपणाच्या अहंकारावर बोलणं घडतच नाही...!
बाईच्या या साऱ्या  घुसमटीची मुक्तता तिच्या लैंगिक मुक्ततेत आहे...आणि अंजली जोशींची बेटी डॉडसन सांगते त्याप्रमाणे बाईची लैंगिक मुक्ती ही अपराधमुक्त हस्तमैथुनातही आहे...!
'लिपस्टिक' चित्रपट पाहून थिएटर मधून बाहेर पडताना एक आवाज कानावर आला..आणि पुन्हा सुन्न झालो..."च्यायला... ह्यापेक्षा बिप्या बघितल्या असत्या तर चाललं असतं...!"
बऱ्याच जणांना तो चित्रपट समजला नाही...!
पण काहीही असो...
"पुरुषाचा माणूस व्हावा" ही अपेक्षा ठेऊन या विषयावर चित्रपट निघणं मात्र महत्वाचं....आणि आपल्यासारख्यानी तो बघून उचलून धरणं हे ही महत्वाच..!

- विनायक होगाडे

6 comments:

  1. अजूनही लैंगीक स्वातंत्र हे स्वैराचारच समजला जातो.
    कालच फायर हा सिनेमा पाहीला.
    म्हणजे लैंगीक अभिव्यक्तीचे धाडसी सिनेमे आधीही बनवले गेलेत.नंतर त्याला विक्रुत समजले गेले व बंदी घातली.
    छान विषय हाताळला आहेस विनायक.well done

    ReplyDelete
  2. Vinayak..hats off..you also taken that risk and you wrote this..mainly we should feel proud that such movies are coming and even some of classical audience are watching it and analyse these conceptual movies..there is need to literate the society about how to watch film..how to deal with content of the movie..untill this will happen.nothing will change..these type of movie will come..some of sensitive people will discuss about them but main target group will not even watch these movie..they need only entertainment..so we have that responsibility to literate our neighbours to watch good film..then and then only these movies will have some impact on society.

    ReplyDelete
  3. अगदी योग्य शब्दात मांडणी केली.खरतर सडकी पुरुषी मानसिकता स्त्री च्या शरीरासोबत व मनासोबत क्रूर पणाच करत असते

    ReplyDelete
  4. मित्रा 'पुरुषाचा माणूस व्हावा ' हे मनाला भिडलं . मस्त लिहल आहेस . लिपस्टिक नाही बघायला मिळाला .लावलाच नाही इस्लामपूर मध्ये कुणीच .

    ReplyDelete
  5. मित्रा 'पुरुषाचा माणूस व्हावा ' हे मनाला भिडलं . मस्त लिहल आहेस . लिपस्टिक नाही बघायला मिळाला .लावलाच नाही इस्लामपूर मध्ये कुणीच .

    ReplyDelete
  6. जबरदस्त लेख.
    "बऱ्याच जणांना चित्रपट समजला नाही"
    खरच आहे!
    कारण 'बाई' आवडली म्हणजे पुरुष झाल्याची लक्षण आहेत माणूस झाल्याची नव्हे.

    ReplyDelete