खुलेआम घोटले जाताहेत...
चिरले जाताहेत विवेकाचे गळे...
मांडला गेलाय बाजार झुंडशाहीचा...अन धर्मांधांच्या द्वेषभक्तीचे होताहेत सोहळे..!
राज्यघटनेची घेऊन शपथ...
गादीवरी आलास...करुनी गाजावाजा...
सांग देवेंद्रा...
अरे कुठे नेऊन ठेवलायस महाराष्ट्र माझा...?
जिथे केंद्रात 'नरेंद्र'...राज्यात 'देवेंद्र'...
तरीही का खुलेआम 'सनातन'चा वीरेंद्र...?
मिळणारे की नाही त्या नथूराम्यांना सजा...?
सांग देवेंद्रा...
कुठ नेऊन ठेवलायस महाराष्ट्र माझा...?
ज्यावेळी तू टेकलेस 'नरेंद्रभोंदूच्या' पायी डोके...आणि केलस वर्तन 'घटनाभ्रष्ट'...
पुरोगामी वाटचालीला तू दिलास फाटा...
आणि केलास 'महाराष्ट्र पथभ्रष्ट...!'
सनातनी वृती पाहतीय मजा...
कारण...पथभ्रष्ट झालाय इथला राजा...
सांग देवेंद्रा सांग...
अरे कुठ नेऊन ठेवलायस महाराष्ट्र माझा...?
'नरेंद्र विरुद्ध नरेंद्र' असा झाला होता ऐतिहासिक लढा...
आणि नरेंद्राला पाडला होता नरेंद्राने उघडा...
चमत्काराचा दावा आणि फसवत होत्या तुझ्या धर्मसत्तेच्या बाता...
म्हणुनी लोकांनीच दिला होता नाणिजला फाटा...
एवढं तरी आठवतयं का देवेंद्रा तुला...?
सांग देवेंद्रा सांग...
कुठ नेऊन ठेवलायस महाराष्ट्र माझा...?
अरे...छेद हवाय या भोंदूगिरीला...
हवाय त्या बुद्धिभेदाला फाटा...
गरज नाहिये त्या भोंदूनरेंद्राची...
महाराष्ट्राला हवते 'नरेंद्र दाभोलकर' आता...
पथभ्रष्ट राजसत्तेला समजेल का रे...
शाहू फुले बाबासाहेब माझा...?
सांग देवेंद्रा सांग...
विवेकाच्या वाटेवर आणशील का महाराष्ट्र माझा...?
- विनायक होगाडे...
No comments:
Post a Comment