माझ्या रुमच्या बाहेरच वडाच्या झाडाखाली तो माणूस सायकल रिपेअरी करतो...पंक्चर काढणे,हवा मारणे ही आणि अशी कामे तूटपुंज्या साहित्यातून करतो..!
जाता-येताना नेहमी "काय...काय..?" असं त्याच्या संबोधण्याची आता सवयच झाली आहे..!
उंचीने बुटका...केस बारीक पण विस्कटलेले...आणि नेहमी निळा ड्रेस परिधान...!
त्याची चौकशी केली असता...एकतर त्याचे वय 45 च्या आसपास...लग्न अजुन नाही...आईबाप केंव्हाच मरून गेलेले...आणि हां असा एकटा...हातावरचं पोट...तरी नाही म्हटलं तरी दिवसाला एक-दोनशे कमवत असेल...!
सकाळी 10 ला सायकल वरुण मागच्या सिटला बारका सामानाचा ट्रंक लाऊन येणे...आणि रात्री 10 च्या आसापास जवळच्याच मेसमधे रात्री उरलेले कमी पैशात जेवण करने...हां नित्यक्रम...!
तसं गिर्हाइक आणि आम्ही रूम्सवर राहणारी पोरं सोडली...तर दिवसभर हा एकटाच मेन रोडच्या गाड्या पाहत...!
दररोज असं नाही पण त्याच्याशी रूम्सवरची पोरं बोलतात कधी-कधी...
बोलताना कधीच एकाच विषयावर धड बोलणार नाही...त्याच्या प्रत्येक वाक्यात हमकास शिवी असणारच..!
आणि बोलणं निघालं की हमखास विषय 'नगराचा' निघतोच निघतो...! आणि एकदा का विषय निघाला की पोरंही त्याला 'तसल्या बायकांबद्दल...त्यांच्या देहविक्रीच्या धंद्याबद्दल खोदुन-खोदून विचारतात...!'
अगदी रेट पासून ते तुम्ही कधी-कधी जाता इथपर्यन्त...!'
हां माणूस आधीच अविवाहित...त्यात उभं आयुष्य तसं एकांतातच...त्यामुळे थोडासा सटकेला...पण कधी दुःखी असा नाही वाटत...कदाचित एकांताची सवयच झाली असावी त्याला...!
त्याला पाहिलं की नेहमी असे प्रश्न पडतात...
याला आयुष्याबद्दल काय वाटत असेल...?
त्याच्यादृष्टीने हा विश्वाचा पसारा काय असेल...?
जाता-येता पाहणाऱ्या जोडप्यांबद्दल त्याचे काय मत असावे...?
त्याच्या म्हातारपणीची तो कल्पना करत असेल का...?
प्रेम ही भावना त्याच्यादृष्टीने आता काय असेल...?
जात-धर्म ह्या एकट्याला कुठे फायद्याचे वा अडचनीचे ठरत असतील का...?
त्याला देवाविषयी काय वाटतं...?
'माणुस,'माणूसपणा' यावर त्याचं अनुभवकथन काय असेल..?
स्वतःच्या अस्तित्वाविषयी त्याला काय वाटत असेल..?
'नगरावर' त्याचा आणि पोरांचा चांगलाच फड रंगतो...पण या जीवन-मरणाच्या प्रश्नांविषयी कुणीतरी त्याच्याशी मुक्त संवाद करायला हवाच...म्हणून आज ठरवलं की ह्याच्याशी आज थोडा वेळ का होईना या प्रश्नांवर बोलायचचं..!
त्याची उत्तरे फार आस्थाव्यस्थ वाटली...आणि उत्तरे ऐकून अस वाटलं की ह्या प्रश्नावर त्याने कधी नीटसा विचारच केला नसावा..!
प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात 'नशीबाला,नियतिला,देवाला शिव्या आणि आपण तरी काय करणार..?' ही पराभवाची वृत्ती झळकत होती...!
पण बोलता बोलता त्याने शेवटी मला अंतर्मुख केलं...!
तो म्हणाला...की मी एकटाय...मला काळं कुत्रं सध्या हुंगलत नाय...ना कुणाला माझ्याविषयी पर्वा हाय...! मी जगलो काय नी मेलो काय...कुणाच्या ल*ड्याला त्याची काय बिशाद...?
पर ध्यानात घ्या...जवा कोंतर पचंर झालेली सायकल घेऊन उन्हात लांबवर झिंगत दूकान शोधत जात असतय आणि त्याला उन्हात कोणतर माझ्यासारखा पंचर काढनारा दिस्तोय ना तवा माझं बी महत्व कळतय...!"
मी फक्त गालातल्या गालात हसलो...
-विनायक होगाडे

No comments:
Post a Comment