Sunday, 11 September 2016

सैराट...!




रक्तात भिजलेल्या...मांसात थिजलेल्या...
त्या उत्कट प्रेमाच्या सरणावर...शोभून दिस्तोय जातप्रतिष्ठेचा अमानुष झेंडा...
की जो वेळोवेळी रोवलाय इथल्या व्यवस्थेणं...अन्
पोसलयं इथल्या भयाण वास्तवानं...

आजवर रचलीयेत हजारो सरणे...
याच दळभद्री मानसिकतेनं...
पचवल्यात हजारो सैराटी कहान्या इथल्या मातीनं...

पण आता मात्र मी पाहतोय...
दूडूदूडू चालू पाहणाऱ्या...त्या पावलांना...
कारण आता वाट काढताहेत त्या रक्ताळलेल्या पावलांचे ठसे...आणि चालाताहेत ते उन्हाच्या कटाविरुद्ध...

उद्या आक्रोशणारी तीच पाऊले...
होतील बळकट...आणि घालतील लाथ...या व्यवस्थेला...
उद्या तीच पाऊले...
होतील झिंगाट...अन् नाचतील सैराट...
या जातव्यवस्थेच्या छाताडावर...
उद्या तीच पाऊले...
सरसावतील पुढे...
आणि फूलवतील झेंडा 'सैराट प्रेमाचा'...
द्वेषीय जातव्यवस्थेच्या सरणावर...
द्वेषीय जातव्यवस्थेच्या सरणावर...

     -विनायक होगाडे

1 comment: