होताहेत करकचून संभोग इथल्या नीतिमूल्यांशी...
अन् क्षणाक्षणाला होताहे स्खलन 'द्वेष'भक्तीचे...
पण गणले जाताहेत तेच बलात्कारी देशभक्त म्हणून की...
की ज्यांच्या नसात वाहतेयं रक्त अमानुष क्रौर्याचे...
की जे करताहेत पदोपदी विनयभंग इथल्या भारतमातेशी...
अन कोंडताहेत तिला त्या सनातनी बुरख्यात...
पण उन्मत्त ते समजताहेत स्वतःला...
म्हणे प्रबळ रक्षक तिच्या अब्रूचे...
त्याच तिरंग्याच्या दोराने...
ते आवळाताहेत तीचे 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' अन् बांधताहेत तीचे कष्टणारे हात...
बडवुनी ढोल अन ताशे...
मात्र करताहेत तिचाच ते जयजयकार...
त्यांनी जेरबंद केलयं तिचे संविधान...
गिळणारेत ते पुन्ह्यांदा तीचे माणुसभान...
तयारी करताहेत ते तिच्या सती जाण्याची...
जमवलेत त्यांनी लाठ्यांसाहित जोशीले हात...
त्या पेटवलेल्या संविधानाच्या सरणावरती...
ढकलताहेत तीला ते आत...
ती कन्हते आहे...ती विव्हळते आहे...
अन् आहे टाहो फोडतेय..
उन्मत्त...उन्मादी हे पुजारी...
मात्र हसताहेत क्रूर द्वेषभावाने...
उन्मत्त..उन्मादी हे पुजारी...
मात्र हसताहेत क्रूर द्वेषभावाने...
उन्मत्त...उन्मादी हे पुजारी...
मात्र हसताहेत क्रूर द्वेषभावाने...
-विनायक होगाडे...
No comments:
Post a Comment