Sunday, 5 March 2017

प्रिय महात्माद्वेष्टयांनो...!


प्रिय 'महात्मा'द्वेष्ट्यांनो...

खुप वेळा आपण जोतीराव फुले आणि मोहनदास गांधी या महात्म्यांवर चिकलफेक करतांना दिसता...फेसबुक-व्हॉट्सप सारख्या सोशल मिडियाच्या माध्यंमात यांच्याविषयी गैरसमजाची वावटळे नेहमी घोंगावत ठेवता....आणि यांची बदनामी करण्याची कसलीही कसर तुम्ही सोडत नाही...!
आता आता तर "हे राम नथुराम" हे नाटक तुम्ही तूफान चालवत आहात...!

काल पुणे मेट्रोच उद्घाटन झालं...
तुम्हाला माहितीय का..?
यावेळी मोदीजींच स्वागत महात्मा फुल्यांचा अर्धाकृती पुतळा देऊन झालं...!
वास्तविक तुमच्यासारखे नमोरुग्ण काडीचाही अभ्यास न करता हिंदुत्वाच्या प्रसारासाठी या दोन महात्म्यांवर वाटेल तशी चिखलफेक करतात...शिव्या देतात...

तरीही मोदिसाहेब मात्र अश्या घटनामुळे तुम्हाला तोंडघशी पाडतात...
अर्थातच तो त्यांचाही नाईलाज असेल की त्यांना परदेशात गेल्यावर "ये बुद्ध और गांधी का देश है..!" असच म्हणाव लागतं...!

समाजात दुही पेरणाऱ्या तुमच्या "बंच ऑफ थॉट्स" ला या महामानवांचे "पंच ऑफ थॉट्स" पुरेसे आहेत...!

जाता जाता एक आठवण सांगतो...

कुणाचे पुतळे किती वा कुणाच्या प्रतीमा किती उभारल्या यावरून एखाद्याच असामान्यत्व सिद्ध होत नाही...हे मान्यच...

तरीही...
विष्णु शास्त्री चिपळूणकरांसारख्या कॄतिशून्य लोकांनी आयुष्यभर महात्मा फुल्यांवर बोचरी आणि अनुदार अशी टिका करण्यातच धन्यता मानली..!

इतके करुणही महात्मा फुल्यांनी हंटर कमीशन समोर साक्ष देताना 19 ऑक्टोंबर 1882 रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकर हे खाजगी शाळा पुण्यात चालवुन गौरवास्पद कार्य करीत असल्याचे नमूद करुण त्यांना पुरेसे अनुदान देण्याची शिफारस केली होती...!

चिपळूणकरांचा पुण्यात फक्त एक अर्धाकृती पुतळा आहे...
आणि महात्मा फुल्यांचे पुणे तर सोडाच संपुर्ण भारतभर पुतळे आहे...!

गांधी तर जगभर आहेत...
तुमचा "नथुराम" त्यांच्या नखालाही पुरायचा नाही...!

आणि हो...शेवटी जाता जाता...

गांधींवर गोळ्या झाडून जस संपवल गेलं...त्याचप्रमाणे फुल्यांनाही मारायला सनातन्यांनी मारेकरी धाडलेले होते...
पण फुल्यांच्या शब्दांनी त्यांच्यात परिवर्तन होऊन ते त्यांचे अनुयायी झाले होते...
'नथुराम' बदलू शकतात..हा देखील याच मातीतला इतिहास आहे...!

जमल तर अभ्यासाने...मनाने आणि कृतीने मोठे व्हा...!

एवढीच अपेक्षा...!

- विनायक होगाडे


No comments:

Post a Comment