"राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तर्क नाही तर आज्ञा चालते. सगळे स्वयंसेवक हे शिक्षकांना त्यांना का हा प्रश्न न विचारता डोळे मिटून आणि डोके बंद ठेवून आज्ञा पालन करत असतात. प्रत्येकाने देशभक्तीसाठी ते केले पाहिजे. संघामध्ये शिक्षकाने डावीकडे जा म्हटले तर त्याला विरोध न करता त्याच दिशेने स्वयंसेवक जातो. संघामध्ये तर्क नाही तर आज्ञेचे पालन कसे करावे याचे शिक्षण दिले जाते."
(08/12/2016 च्या लोकसत्तेतील बातमी)
असं वक्तव्य RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे...!
खरं तर या वक्तव्याबाबत संघचालकांचे कौतुक करायला हवं...की त्यांना आपल्या संघटनेचं 'खुले गुपित' स्वतःच्या तोंडानी जगजाहिर केले आहेे...!
गोलवलकर गुरुजींच्या 'we' आणि 'विचारधन' या पुस्तकांचा निरक्षीर बुद्धिने विचार केल्यास त्यात तर्काला आणि बुद्धिवादाला स्थान आहे...असं म्हणवत नाही...!
जाज्वल्य धर्माभिमान आणि त्याच्या महत्तेच्या सिद्धतेसाठी काहीही...हेच धोरण संघाचे राहिलेले आहे...!
संघाचे सरसंघचालक नेहमी परमपूजनीयच असतात...
त्यामुळे त्यांच्या मांडणीचा डोळसपणे सारासार विचार करण्याचा आणि त्यावर शंका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही...! संघचालक किंवा वरिष्ठ सांगतिल तो इतिहास आणि ते सांगतिल ते विज्ञान...!
श्रद्धेचे मानवी जीवनात अनन्यसाधारण स्थान आहे...पण,कोणत्याच श्रद्धा या तर्काधिष्टित नसतात...!
हिंदू लोकांच्या श्रद्धेच ज्यांना बेमालूमपणे राजकारण करायचे आहे...त्यांना सगळेच महामानव वंदनीय वाटतात...आणि सगळेच लोक आपले मानावे लागतात...!
त्यामुळेच संघाला सावरकर ही प्रिय वाटतात आणि आंबेडकरही...!
एकदा का आंबेडकर आणि सावरकर आमचे,असं म्हणले की...दोहोंच्या विचारधारेतला फरक...मांडणी...कोण योग्य...कोण अयोग्य...!
अशापद्धतीची चिकित्सा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही...! म्हणूनच संघाला सगळे आपले वाटतात...आणि मानावे लागतात...!
आणि याच धोरणामुळे नथुरामाचे नाटक तूफान चालवणाऱ्या संघसेवकांना गांधीही प्रातःस्मरणीय मानावे लागतात...!
तर्क श्रद्धेचा पराभव करू शकतो...आणि जुन्या श्रद्धाच्या पराभवातूनच नवे विचार जन्माला येतात...!
तर्काला निषिद्ध माणनर्या संघाला हे श्रद्धेचे राजकारण सोईस्कर आणि प्रिय आहे...!
हिंदू धर्मातील रूढी-परंपरा यांची चिकित्सा करावी...त्यातील अमानुष रुढी टाकून द्याव्यात...हिंदू समाजमन प्रागतिक करावे...बुद्धिवादी बनवावे...ही उठाठेव संघाला गरजेची वाटत नाही...!
समाजमन आपोआप बदलत...अशी संघाची श्रद्धा आहे...ते बदलावे लागतं आणि ते बदलण्यासाठी याच समजाशी झगडा द्यावा लागतो...संघर्ष करावा लागतो..असं संघाला वाटत नाही...!
म्हणूनच समाजसुधारनेची कोणतेही चळवळ संघ हातात घेत नाही...!
बुद्धिप्रामान्यवादि विचार हिंदू लोकांनी आत्मसात करावा...आणि त्यासाठी विचार लोकांसमोर ठेवून त्याचा जागर करावा...ही संघांची पद्धतच नाही...!
'सर्व हिंदूंनो एक व्हा...संघटित व्हा...आणि संघटित होण्यासाठी संघात या...!'
यापलिकडे काही सांगण्यास संघ तयार नाही...!
आपल्या स्वयंसेवकांना तर्काचे,चिकित्सेचे आणि विचार करून प्रश्न विचारण्याचे महत्व पटवून देऊन संघ स्वतःवर आपत्ती ओढवून घेऊ इच्छित नाही...!
आणि म्हणूनच स्वतःला प्रश्न विचारावून घ्यायची सवयच नसलेल्या मोहन भागवतांना लहान मुलगी जेंव्हा "राममंदिर बांधल्याने भुकेचा प्रश्न मिटेल का...?" हा प्रश्न विचारते...तेंव्हा त्यांची बोबडी वळते....!
हिंदू मनामध्ये असलेल्या सुप्त धर्माभिमानाचा शक्य तितका स्फोट करणं...हेच हिंदुत्वाचे संस्कार...!
हिंदू लोकांसमोर हिंदुत्व,राष्ट्रीयत्व,धर्माभिमान...संस्कृती,संस्कार यांचे प्रचण्ड धुके उभे केल्याशिवाय आपण वाढू शकणार नाही...याची पुरेपूर जाणीव संघाला आहे...!
म्हणूनच संघ निरक्षीर विवेकाने डोकं वापरायची शीकवण आपल्या स्वयंसेवकाना देत नाही...!
या साऱ्या श्रद्धेच्या खेळाला एका द्वेषाची किनार आहे...!
तरुण हिंदू मनाला समोर कुणीतरी शत्रू दाखवल्याशिवाय आपण काहीतरी महान कार्य करतोय...याची जाणीव अंतरंगात होणे अशक्य आहे...!
म्हणूनच हिंदुत्व म्हणवणाऱ्या विचारसरणीला इतर आणि खासकरुण मुस्लिम धर्माच्या द्वेषाची किनार आहे...!
भारत-पाकिस्तान फाळणीवेळी जर सगळे मुस्लिम पाकिस्तानात रवाना झाले असते...तर भारतात हे हिंदुत्व फोफावण्यास आणि इतक्या लवकर सत्तेत येण्यास मदत झाली नसती...!
भारतात असलेले मुस्लिमांचे अस्तित्व हां हिंदुत्वाच्या अस्तित्वाचा सुद्धा प्राण आहे...असं मला वाटत..!
'ये तो महज एक सांकृतिक संघटन है...' असं म्हणून 'आम्ही राजकारणी नाही...राजकारण करणार नाही...!' असं म्हणत म्हणतच हिन्दुत्वाचे राजकारण करुण सध्या सत्तेत असणारा संघ याच कारणाने स्वातंत्र्य लढ्यापासून कोसों दूर होता...!
आपल्याच धोरणावरुण सोईस्कररित्या कोलांटी उडी खाणे...हां आजतागायतचा इतिहास राहिला आहे...!
नथुरामाचे स्वयंसेवकत्व इथपासून ते बाबरी मस्जिद नेस्तनाबूत करण्यानंतरच्या देशभरच्या दंगलीची जबाबदारीही खुल्या मनाने संघ स्वीकारत नाही...!
तरीही संघ वाढतोय...!
संघांचे खरे सामर्थ्य त्याच्या चिकाटित आणि शिस्तप्रियतेत आहे...! धर्माच्या नावावर आधुनिक हिंदू मने आपल्याभोवती गुंडाळून ठेवण्यात संघ यशस्वी राहिला आहे...!
संघात तर्क नाही तर आज्ञा चालते...या वक्तव्याचा परामर्श घेताना शेवटी इतकेच म्हणाव वाटत...!
तर्क कुतर्कासी...
ठाव न लगे सायासी...
येथे भावची प्रमाण...
ठेवा जाणीव गुंडोण...
म्हणजे तर्क करायचा नाही कारण तो कुतर्क आहे...
इथे भावनेलाच प्रमाण माना...आणि निरक्षीर जाणीव गुंडाळून ठेवा...!
- विनायक होगाडे
No comments:
Post a Comment