Sunday 11 December 2016

धर्माच्या पांघरुणात...जातीचा खेळ....



तसं पहायला गेलं तर जगातील सर्वच धर्मात विषमता आढळते...विषमता नसलेला एकही धर्म शोधून सापडनार नाही...!
इतर सर्व धर्मातील विषमता आणि हिंदू धर्मातील विषमता यात फरक असा आहे... की जगभरातील विषमतेला कायद्याने मान्यता होती...पण धर्माने ती पवित्र आणि पूज्य ठरवलेली नव्हती...धर्माचा भाग म्हणून या विषमतेला पावित्र्य बहाल करण्याचं वैशिष्ट्य फक्त हिंदू समाजरचनेचे आहे...तुझा निचपणा आणि माझी श्रेष्ठता ही ईश्वरी इच्छा आहे...आणि हाच धर्म आहे...!

सारी हिंदू परंपराच विषमतेची समर्थक परंपरा आहे..
हिंदू धर्मातली जातव्यवस्था ही जन्माधिष्ठित आहे...हिंदू धर्मियांची ही उच्चनीच म्हणून विभागणी गुणकर्मावर आधरलेली नाहिये...तर ती जन्माधिष्टित आहे...! आणि तिचे जन्माधिष्टित असन हेच तिचं सामर्थ्य आहे...!
भारतात हिंदू धर्मात असलेल्या जातव्यवस्थेची उतरंडीवर अनेकांनी प्रहार केलेले आहेत...! "जातिअंत" हेच अंतिम उदिष्ट या समाजरचनेला समता बहाल करू शकेल अशी आशा अनेकांना वाटते...!
पण काहींचा मुद्दा असा असतो की आता कुठे राहीलीय अस्पृश्यता...? आता कुठे राहिलिय जातव्यवस्था इतकी बळकट...? हिंदू धर्मावर टिका करण्यासाठी हा मुद्दा तुम्ही वापरता...वगेरे वगेरे...!

खरं तर ह्या तकलादु मुद्द्यांना पुढे करुण या विषयाची सांगोपांग चर्चा होणे अशक्य आहे...!

आजही काही लोक,संघटना चातुर्वण्याचे समर्थन करताना गुणकर्मावर आधारित चातुर्वण्याचा पुरस्कार करतात...! 21 व्या शतकातील सुशिक्षित हिंदू मनाला पुन्हा या विषमतेने ग्रासवायचे असेल तर ही सोईस्कर भाषा वापरली जाते...!

"जो कर्माने श्रेष्ठ तो ब्राम्हण...हे ब्राम्हण्यत्व जन्माधिष्टित नाही तर कर्माधिष्टित आहे...आणि हाच वेदांचा मूळ गाभा होता...पण मध्यंतरी कलुषित समाजमनामुळे ही उदात्त भावना मागे पडली..."
वगेरे वगेरे प्रवाद काही लोक मांडताना दिसतात...
पण ह्या प्रवादाला पुढे करुण जातव्यवस्थेचेच्या उतरंडीचे समर्थन करु पाहनारे सोईस्करपणे काही वास्तविक अडचणी विसरतात...

गुणकर्मावरून चातुर्वर्ण्य ह्या भूमिकेतील मुख्य अडचण ही आहे की,म्हातारपणापर्यन्त एकेकाचे आयुष्य तपासून पाहिल्याशिवाय त्याचा वर्णच ठरवता येणार नाही...! बर असं करुण वर्ण ठरवायचे म्हंटल्यास हे वर्ण ठरवनार कोण...? आणि पुरुषाला त्याच्या कर्तुत्वावरून ब्राम्हण्यत्व बहाल केलं...पण आयुष्यभर घरात घरकाम करुण जीवन पतीच्या सेवेत व्यथित केलेल्या त्याच्या बायकोला शुद्रत्व द्यावे की ब्राम्हणाची बायको म्हणून ब्राम्हण्य द्यावे...?

खरं तर...ह्या ओंगळ कल्पनेची व्यवहार्यता समाजाच्या प्रगतीस कितपत योग्य आहे...हाहीं संशोधनाचा विषय ठरेल..!

पुन्हा या जातव्यवस्थेचे समर्थन करताना काही लोक विषमता हीच नैसर्गिक कशी आहे...याचे दाखले देत बसतात...

हाताची पाच बोटे तर कुठे समान आहेत...? विषमता ही निसर्गदत्त आहे...त्याला आपण काय...? असा हां लंगड्या समर्थनाचा सूर असतो...!
'कशीही हालचाल करू शकतो म्हणून अंगठा श्रेष्ठ आणि सर्वात बारकूळी म्हणून करंगळी तुच्छ...ती अस्पृश्य...!तीने हालाचाल करायचीच नाही...!'
ही विषमता कुठे निसर्गाने दिलीय...?

खरं तर अशा तकलादु दाखल्यांमधुन पुन्हा विषमतेचं बुद्धिभेदी समर्थन करत सुशिक्षित म्हणवणारी हिंदू मने पाहिली की कीव येते...!

"जात नाही ती जात...!" अशा हतबली सुरातून किंवा "जातिसाठी माती खावी...!" अशा सहजी बोलण्यातून आपण नकळत मोठ्या अमानुष विषमरचनेचं समर्थन करतोय हेही काही लोकांना उमगत नाही...!

आपल्याच धर्मबांधवांना गावकुसाबाहेर काढून अस्पृश्य ठरवणाऱ्या या व्यवस्थेचा इतिहास पुनरुज्जीवित करायचा नसेल तर जातीला मुठमाती द्याविच लागेल...!
पण हे काम तितकेसे सोपही नाहिये...
कारण...
सध्या निघनारे जातिधारित मोर्चे-प्रतिमोर्चे पाहिले की आजचे हे कटु वास्तव लक्षात येते...
अखंडपणे काही शतके चाललेल्या जातिअंताच्या लढाईची चक्रे पुन्हा उलटी फिरताहेत की काय...? अशी भीती माझ्यासारख्या सर्वसामान्याला वाटते...!
'जात बळकट करुण जातिअंत होत नसतो...'
हे वास्तव या समाजाच्या लक्षात जेंव्हा येईल तो सोन्याच्या दिन असेल...हे मात्र नक्की...!

कथित हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या संघटना..."सर्व हिंदुनो,संघटित व्हा आणि संघटित होण्यासाठी आमच्या संघटनेत या..!" यापलिकडे काही सांगण्यास तयार नाहीत...!
हिंदुत्व,राष्ट्रीयत्व,धर्मनिष्ठा यांच्या धुक्याखाली जातव्यवस्थेची संगोपना छुप्या पद्धतीने होत आहे...हे वास्तव आहे...!
आणि आधुनिक सुशिक्षित लोकांचा हा सोईस्कर धर्मवाद ही चिंतेची बाब आहे...!

-विनायक होगाडे

No comments:

Post a Comment