Sunday, 11 September 2016

ती म्हातारी...

बसमधे शिरलो..

कंडक्टरीन बाईच्या बाजूला जाऊन बसलो...
पुढच्याच स्टॉपला एक म्हातारी बसमधे कशीबशी चढली...शिटवर बसण्याऐवजी तिनं पहिल्या शिटच्या म्होरं खाली बसणंच जास्त पसंद केलं...
भगवं झंपर...हिरवं लुगडं...आणि हातात ती वायरीची मळकी पिशवी...! पण तीचा पैस्याचा बटवा मात्र जास्तच मळका दिसत होता...
सुट्ठं पैसं नव्हतं म्हणून अर्ध तिकीट काढताना कंडक्टरीन बाई तीला जरा खेकसलीच...
त्यावेळी म्हातारी जरा हसुनच काय तरी बोलली...
सुरकुतलेला चेहरा... वर चार आणि खाली चार दात... ते बी मिश्री घासुन काळवंडलेले....कपाळावर इबिताच्या तीन पट्ट्या...आणि त्यावर आणि भंडारा...एवढ्या सगळ्याच्या आडूनही तिचं हिरवझ्याक गोंदन डोकं वर काढून पाहत होतं..!
पण खळखळून हसल्यावर ती आणखीनच छान दिसली...लहान पोरासारखी...!



जाता-जाता स्वताच्या म्हातारपनाची कल्पना केली...खळखळून हसावं...आणि मनमुराद जगावं...हाच काय तो बोध मी उकरून काढला...!

No comments:

Post a Comment