Sunday, 11 September 2016

संभोग : अनीतीचा धर्माशी....!

केलाय इथे अनीतीने करकचून संभोग....

सगळ्या धर्मांशी...
की ज्यातून पैदा झालीयेत अपत्यं...
जात....वर्ण...द्वेष... नावाची
की ज्या अपत्यांच्या नसानसात
धर्माचं वीर्यच रक्त म्हणून वाहतंय...
की ज्या अनीतीच्या अनैतिक संभोगातून लागण झालीये इथल्या धर्माना...
त्या 'धर्मांध' विषाणूची...
की ज्यामुळ पदोपदीे दुखावतात इथल्या
माणूस नावाच्या जनावराच्या भावना...
तोडफोड...जाळपोळ...आणि माणूस मारल्यावरच
इथं थंड होतात यांच्या
त्या दुखावलेल्या भावनांचे वर्मी घाव...

पर्वा नाहीये या धर्मांध विषाणूंना....
माणसाची...ना माणूसकीची...

जे विषाणू खुलेआम सडवत चालले आहेत इथल्या माणसांचे मेंदू...
आणि बनवतायत निष्पाप अर्भकांना
त्यांच्यासारखीच
'माणूस नाव असलेली हिंस्र जनावरं...!'

आणि एक काळ असा उभा ठाकेल की ज्यावेळी...
माणूस नावाचा प्राणी नामशेष झालेला असेल या पृथ्वीतलावावरून कायस्वरूपी...
आणि याला एकमेव कारणीभूत असेल....

तो म्हणजे नीती साठी स्थापन केलेला
आणि
माणसालाच जड झालेला 'अनीतीमय धर्म...!'

   -विनायक होगाडे...


No comments:

Post a Comment