तर मित्र-मैत्रीनींनो...
आजवर शाळेत असताना मूल्यशिक्षणाच्या तासाला मूल्यांमधे आपण 'वैज्ञानिक दृष्टिकोण' हां शब्द नेहमीच ऐकत आलोय...हां दृष्टिकोण 'माणूस' म्हणून परिपूर्ण जीवन जगण्यासाठी फार फार महत्वाचा आहे...! केवळ 400 वर्षापुर्वी मानवाला समजलेला हां दृष्टिकोण मानवाची विश्वाकडे पाहण्याची दृष्टीच आरपार बदलवुन गेला..!
आपल्या संविधानात अस लिहलयं की,
प्रत्येक भारतीय नागरिकांच हे कर्तव्य आहे की त्याने 'वैज्ञानिक दृष्टिकोणाचा' प्रचार,प्रसार आणि अंगीकार केला पाहिजे...!"
1987 साली आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात
"वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती" या महत्वाच्या गाभाघटकाचा समावेश करण्यात आला आहे..!
मूल्यशिक्षण शाळेेमधे शिकवले जाते...त्या मूल्यशिक्षणात ''वैज्ञानिक दृष्टिकोण'' महत्वपूर्ण मानला आहे...!
मग नेमकं वैज्ञानिक दृष्टिकोण म्हणजे तरी काय...?
"कुठल्याही घटितामागचा कार्यकारणभाव समजून घेणे किंवा दोन घटनांमधील परस्परसंबंध तपासून पाहणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोण...!" अशी एकदम साधी-सोपी व्याख्या करता येईल...!
किंवा असही म्हणता येईल की "जेवढा पुरावा उपलब्ध आहे,तेवढा विश्वास ठेवणे.."
एखादी गोष्ट सत्य आहे का नाही,यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोण "निरीक्षण,तर्क,अनुमान,प्रचिती आणि प्रयोग..." या मार्गांनी ज्ञान आत्मसात करण्याची विज्ञानाची ही पद्धत आहे...
1.वैज्ञानिक दृष्टिकोण शब्दप्रामाण्य म्हणजे कुणी एका मोठ्या व्यक्तिने सांगितले म्हणुन खरे मानायचे,हे
नाकारतो..!
वैज्ञानिक दृष्टिकोण ग्रन्थप्रामाण्य म्हणजे कुणाच्या तरी पुस्तकात लिहलय म्हणून ते चिकित्सा न करता स्वीकारणे हे नाकरतो..
2. चमत्काराचा दावा करने हे लोकांना मूर्खात काढण्याच प्रभावी साधन आहे... वर नमूद केल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही... "चमत्कार करणारे बदमाश असतात,त्यावर विश्वास ठेवणारे मुर्ख असतात,आणि याला विरोध न करणारे भ्याड असतात..!"
चमत्करामागे हातचलाखी वा विज्ञान यापैकी काहीतरी एक असते..!
3) जगात सुष्ट शक्तिमुळे चांगले अथवा दुष्ट शक्तिमुळे वाईट अजिबात होत नाही.. जे काही घडत त्यामागे निश्चितच कारण असते..आणि ते वैज्ञानिक दृष्टिकोनाच्याच आधारे शोधता येते..
4)आजवर झालेली माणसाची प्रगती केवळ 'विज्ञानाच्या' आधारे झालेली आहे.. विज्ञान नेहमीच नम्र असते, ते नवनवीन बदलांना आत्मसात करतं.. धर्माप्रमाणे ते अंतिम सत्याचा दावा अजिबात करत नाही...
5) 'मानवाचा आजवरचा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे' विज्ञानाने आलेले बदल धर्माला काळाच्या ओघात स्वीकारावे लागले... आजवर धर्माने एकही मानवी प्रगतीसाठी नविन शोध लावलेला नाही..
6)वैज्ञानिक दृष्टिकोण आत्मसात करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे "छद्म विज्ञान (pseudo science)" यापासून सावध असले पाहिजे.. छद्म विज्ञानाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे "वास्तू शास्त्र, जोतिष शास्त्र"...
7) आज समाजात अनेक गोष्टी 'यामागे विज्ञान आहे' अस सांगून जनसमान्यांच्या माथी थोपवल्या जातात... त्या गोष्टीत नक्की विज्ञान आहे का, हे "वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे ठरवावे..
विज्ञानाला आज सगळ्या गोष्टींची कारणे माहित नाहीत,पण ती कारणे वैज्ञानिक दृष्टिकोणाच्या आधारेच समजू शकतात..
8)"आपल्या जीवनात आज जे जे काही घडतं,त्यामागे पूर्व संचित आहे,नियती आहे,नशीब आहे,पूर्वजन्मीच पाप आहे.."
अस समजने हा पळपुटेपनाचा मार्ग आहे..
कष्टाला पर्याय नाही..हे वैज्ञानिक दृष्टिकोण सांगतो..!
9)आत्मा-परमात्मा,जन्म-मृत्यु,प्रारब्ध-संचित-नशीब-मोक्ष यांची मांडणी अनेक धर्मानी,अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे...व्यक्तिपरत्वे हा गोंधळ बदलू शकतो... वैज्ञानिक दृष्टिकोन हे सारा फसवेपना नाकरतो... जे विज्ञानाच्या कसोटिवर टीकते, ते ते खरं..अस वैज्ञानिक दृष्टिकोण सांगतो..!
10)धर्माच्या शिवाय माणसाच्या विवेकातून नीती निर्माण होऊ शकते,असे वैज्ञानिक दृष्टिकोण सांगतो..!
"इतरांनी आपणाशी जसे वर्तन केलेले आपनाशी आवडत नाही,तसे वर्तन आपन इतरांशी करू नये...आणि इतरांनी आपणाशी जसे वर्तन केलेले आपल्याला आवडते,तसे वर्तन आपणदेखिल इतरांशी करावे..!"
वैज्ञानिक दृष्टिकोण नेहमीच नम्र असतो..मी सांगितलेला शब्द अंतिम सत्य असा दावा तो करत नाही..! तो नवनवीन सत्य पुराव्या आधारे स्वीकारत जातो..!
थोडक्यात असं की,
1.प्रत्येक कार्यामागे कोणते ना कोणते कारण असतेच..!
2.ते कारण मानवी बुद्धीला समजू शकते.
3.सर्वच गोष्टींची कारणे समजतात असे नाही,परंतु ज्यावेळी समजतील त्यावेळी कशाप्रकारे समजतील हे नक्की समजते.
म्हणून पंडित नेहरू वैज्ञानिक दृष्टिकोणाचे महत्व सांगताना लोकसभेत म्हणतात की...
Scientific Temperament is a Process of Thinking,Method of Action,Search of Truth,Way of Life,Spirit of Free Man...!
म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोण ही विचार व कृती करण्याची पद्धती आहे,सत्यशोधनाचा मार्ग आहे,जीवनाचे दिशादर्शन आणि व्यक्तीला जानिवांचे स्वातंत्र्य वैज्ञानिक दृष्टिकोनानेच प्राप्त होते..!
आणि सर्वात महत्वाचं असं की ज्या आकलनाच्या परिपक्वतेअभावी या देशातील असंख्य प्रश्नाना वाचा फुटली नाही...ती 'आकलनाची परिपक्वता' वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करतो..!
भारतीय संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या नागरीकत्वाचं भरण-पोषण प्रामुख्याने हां वैज्ञानिक दृष्टिकोण करतो..!
यावरुन किमान आपणाला "वैज्ञानिक दृष्टिकोणाची" तोंडओळख तर नक्कीच झाली असेल...!
अधिक माहितीसाठी नरेंद्र दाभोलकर लिखित "तिमिरातुनि तेजाकडे" हे पुस्तक नक्की वाचा...!
युवा मित्र-मैत्रिणीनो..
हा 'वैज्ञानिक दृष्टिकोण' आपणाशी विवेकी मूल्यपरिवर्तनाचा कृतिशील संवाद साधू इच्छितो...
विचार तर कराल..?

No comments:
Post a Comment